वरंधा घाटात मिनी बस कोसळून चालकाचा मृत्यू

पुणे- भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात काल रात्री मिनी बस कोसळून बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार प्रवासी जखमी झाले. बसचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस 50 ते 60 खोल दरीत कोसळली. धरणाच्या पाण्यापासून ५ फुट अलीकडे बस अकडून पडली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये चालकासह १० प्रवासी होते.
पुणे स्वारगेटहून भोरमार्गे महाड-चिपळूणकडे जाणारी मिनी बस वरंधा घाटात कोसळल्यानंतर अडकून पडल्याने ४ प्रवासी दरीतून बाहेर आले. त्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वाहनचालकाने अपघातस्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेलमालकाला या अपघाताची माहिती दिली. हॉटेल मालकाने प्रसंगावधान दाखवून शिरगावच्या तरुणांना बोलवून घेतले. त्यानंतर या तरुणांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी अडकलेल्या बसला दोरी बांधली आणि त्यानंतर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. जखमींना भोर‌ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top