वर्सोवा विरारा सागरी सेतुला मच्छिमारांचा तीव्र विरोध

वर्सोवा- वर्सोवा ते विरार सागरी सेतूला मच्छिमार बांधवांचा जाहीर तीव्र विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर भाटी कोळीवाडा गाव पातळीवर जनजागृती व जाहीर विरोध सभा काल घेण्यात आली. या सभेचे आयोजन भाटी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड व भाटी मच्छिमार ग्राम विकास मंडळ या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व कार्यकारी सदस्यांनी केले होते.
या सभेला भाटी कोळीवाडा गावातील भगिनी, बांधव, युवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर या सभेला शेजारच्या पातवाडी गावातील भगिनी व ग्रामस्थ तसेच मढ गावातील ग्रामस्थ ही उपस्थित होते. शिवाय सभेला मार्गदर्शन व प्रबोधन करण्यासाठी भाटी मच्छिमार सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी, पातवाडी मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी मढ मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी, वर्सोवा ग्रामस्थ मंडळ तसेच वर्सोवा मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी तसेच मरोळ मच्छि मार्केट च्या पदाधिकारी व महिला भगिनी ही उपस्थित होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top