वसईत जांभळी मेणबत्ती लावून नाताळ सण जल्लोषात सुरू

वसई- ठाणे जिल्ह्यातील वसईत नाताळ सणाची लगबग दिसू लागली आहे. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी शहरातील सर्व चर्चमधून जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावून नाताळ सणाचा शुभारंभ करण्यात आला.

२५ डिसेंबरला साजर्‍या होणार्‍या मुख्य नाताळ सणाचा काळ सुरू झाला आहे. यावेळी शहरातील सांडोर चर्चमध्ये लहान मुलांनी जांभळी मेणबत्ती लावून नाताळच्या आगमन काळाचे उद्घाटन केले.या महिन्यातील चार रविवारी प्रत्येक चर्चमध्ये
वेगवेगळ्या मेणबत्त्या प्रज्वलित करून विधी साजरा केला जातो. पहिल्या रविवारी चर्चमध्ये एक चक्र लावले जाते.ते हिरव्यागार पानांनी आणि डहाळ्यानी सुशोभित केले जाते. हिरवा रंग शाश्वताचे प्रतीक असतो.

पहिल्या रविवारी संदेष्ट्याची मेणबत्ती लावली जाते. यादिवशीचे पहिले वाचन
संदेष्ट्याच्या ग्रंथातून घेतलेले असते.दुसर्‍या रविवारी बेथलहेमची मेणबत्ती लावली जाते.ती नाताळ गुहेची आठवण करून देते. तिसरी मेणबत्ती मेंढपाळाची गुलाबी रंगाची आणि चौथी मेणबत्ती देवदूताची म्हणुन लावली जाते.नाताळच्या आदल्या दिवशी सायंकाळी म्हणजे २४ डिसेंबरला सफेद मेणबत्ती लावली जाते.ही मेणबत्ती बाल येशूचे प्रतीक म्हणून लावली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top