Home / News / वसई ठाणे भुयारी मार्ग ‘एमएमआरडीए’चा निर्णय

वसई ठाणे भुयारी मार्ग ‘एमएमआरडीए’चा निर्णय

ठाणे – ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा आणि ठाणे वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास वेगवान करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’कडून घेण्यात आला आहे. त्यासाठी वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे २० हजार कोटींचा खर्च येणार आहे.