वांद्रे,खार भागात १४ दिवस १० टक्के पाणीकपात लागू

मुंबई- शहरातील पाली हिल जलाशयात पुनर्वसनाचे काम केले जाणार असल्याने काल मंगळवारपासून वांद्रे आणि खार पश्चिम येथील काही भागात १० टक्के पाणीकपात लागु करण्यात आली आहे.ही पाणीकपात ११ मार्चपर्यंत म्हणजे पुढील १४ दिवस असणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या जलविभागाने केले आहे.
पालिकेच्या जलविभागाने म्हटले आहे की,एच- पश्चिम विभागातील कांतवाडी, शेरली राजन,गझधर बंध भाग आणि दांडपाडा,दिलीप कुमार झोन,कोल डोंगरी झोन,पाली माला झोन आणि युनियन पार्क झोन, खार (पश्चिम) तसेच वांद्रे पश्चिमेच्या काही भागात ही १० टक्के पाणीकपात असणार आहे.सध्या मुंबईच्या मध्य वैतरणा धरणात १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व ७ धरणात मिळून फक्त ४४ टक्केच पाणीसाठा आता शिल्लक आहे.भातसा धरणातील राखीव जलसाठ्यातील पाणी मिळवण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मात्र, भातसा धरणातील पाणी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top