वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे बांधकाम 11 टक्के पूर्ण

मुंबई
वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूच्या कामाने अखेर वेग घेतला आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे 11 टक्के काम पूर्ण झाले आहे असून आता लवकरच सागरी सेतूच्या समुद्रातील कामास सुरुवात करण्यात येणार आहे. हा सागरी सेतू डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीएचे नियोजन आहे.
या सागरी सेतूला जोडणाऱ्या 17.17 किमीच्या आणि सात हजार कोटी खर्चाच्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाचे बांधकाम एमएसआरडीसीकडून केले जात आहे. या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली. मात्र काम सुरु झाल्यानंतर काही दिवसातच कोरोनामुळे ते बंद झाले. 2019 ते 2021 या कालावधीत प्रकल्पाचे केवळ अडीच टक्केच काम झाले होते. एमएसआरडीसीने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई केली. कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून सप्टेंबर 2021 पासून दिवसाला साडेतीन कोटी दंडही आकाराला. शेवटी कंत्राट रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर मात्र या कंपनीने जानेवारी 2022 मध्ये कंत्राटदाराने रिलायन्स इन्फ्राशी असलेली भागीदारी संपुष्टात आणून नवीन भागीदाराची निवड करत कामाला सुरुवात केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top