वाकोल्यामध्ये पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

मुंबई- सांताक्रुझ पूर्व येथील वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कलिना पोलीस वसाहतीच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने गळफास घेत आत्नहत्या केली. प्रल्हाद बनसोडे (४२) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. बनसोडे यांनी पोलीस वसाहतीच्या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेत आत्महत्या केली. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
प्रल्हाद बनसोडे हे जळगावचे निवासी होते. बनसोडे मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी जळगावमधून मुंबईतील कलिना बीडीएस पोलीस स्टेशनला बदली झाली होती. पण बनसोडे यांना जळगावला बदली पाहिजे होती, त्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यांची बदली होत नव्हती. त्यामुळे तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. बनसोडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top