वाघेश्वर मंदिरातील प्राचीन घंटा चोरीला

पुणे

पुण्यातील पवन मावळमधील वाघेश्वर येथील प्रसिद्ध शिवमंदिरातील प्राचीन घंटा काल चोरीला गेली. ही घंटा ८ किलो वजनाची होती. हा प्रकार समजातच ग्रामस्थ संतापले. या चोरीची वडगाव मावळ पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. शिवमंदिरातील पुजारी लक्ष्मण गुरव सोमवारी पूजा केल्यानंतर ते घरी निघून गेले. दुसर्‍या दिवशी ते मंदिरात पूजेसाठी गेले असता मंदिरातील घंटा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुजाऱ्याने सर्व ग्रामस्थांना मंदिरात बोलावून ह्या चोरीची माहिती दिली.

काही महिन्यांपूर्वी वाघेश्वर येथील मंदिरातील प्राचीन मुखवटे व अन्य वस्तुंची चोरी झाली होती. त्यातील काही वस्तू मंदिर परिसरातच सापडल्या. आता पुन्हा प्राचीन घंटा चोरीला गेल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान या मंदिरात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सर्व ग्रामस्थांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top