वाढवण बंदरासाठी २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळू काढणार

उरण – जेएनपीए प्रस्तावित सुमारे ७८ हजार कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदरासाठी जमीन तयार करण्यासाठी ड्रेजिंग करून २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळू काढण्यात येणार आहे.ही चांगल्या प्रतीची वाळू मिळविण्यासाठी प्रस्तावित वाढवण बंदरापासून अरबी समुद्रात सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आणि दमण किनाऱ्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर सॅण्ड बॉरो पिट म्हणजे साठा शोधला असल्याची माहिती जेएनपीएने दिली आहे.
मच्छीमारांचा वाढवण बंदरासाठी प्रचंड विरोध आहे.डहाणू तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या आणि ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी पर्यावरण मंजुरी मिळविण्याचा एक भाग म्हणून पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार २१ डिसेंबर रोजी दमण येथे अतिरिक्त टीओआरनुसार सुनावणी घेण्यात आली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीने दमण, दादरा आणि नगर हवेलीचे उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत दमण येथे ही जनसुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीसाठी विविध भागधारक आणि मच्छीमार समुदाय उपस्थित होते.सार्वजनिक सुनावणी दरम्यान संबंधितांनी व्यक्त केलेल्या विविध चिंतांचे निराकरण करण्यात आले. वाढवण बंदराच्या विकासासाठी सर्वसमावेशक पर्यावरण मंजुरीसाठी सार्वजनिक सुनावणीचे कार्यवृत्त पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top