वादग्रस्त ब्रजभूषण यांच्या मुलाला लोकसभेचे तिकीट

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांचे तिकीट कापून भाजपाने आज त्यांचा धाकटा मुलगा करण सिंह यांना उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथून उमेदवारी दिली आहे. करण सिंह यांनी डॉ, राम मनोहर लोहिया विद्यापिठातून बीबीए आणि एलएलबीची पदवी संपादन केली आहे. ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. डबल ट्रॅप शूटिंगमध्ये ते राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूही होते. ते सध्या उत्तर प्रदेश कुस्ती महासंघांचे अध्यक्षही आहेत.तसेच ग्राम विकास बँकेचे अध्यक्षपदही भूषवत आहेत. २० मे रोजी येथे निवडणूक होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top