वाळू वाहतूक करणार्या ट्रकची दुचाकीला धडक! २ ठार

बीड

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सादोळा गावाजवळ असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. विजय युवराज पगारे (३७) व महेश रावसाहेब ढोकचवळे (३३) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील रहिवासी होते.

विजय युवराज पगारे आणि ढोकचवळे हे दोघेजण काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सादोळा गावाजवळील सांगवी पुलावरून आष्टी शहराकडे जात होते. यावेळी सादोळा गंगा पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. यावेळी ट्रक देखील पलटी झाला होता. अपघातांतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top