विजेच्या धक्क्याने २ कामगारांचा मृत्यू

बीड : बोअरिंग करण्यासाठी जात असलेल्या बोअरच्या गाडीचा परळी जवळ विद्युत वाहकतारांना स्पर्श झाल्याने गाडीवरील २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अन्य २ कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे
या दुर्घटनेतील चारही कामगार परळी शहरालगत असणाऱ्या वाघबेट येथे पाण्याचा बोअर करण्यासाठी आले होते. सकाळी बोअरिंगच्या कामाला सुरवात झाली. काम आटोपल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली होती.
बोअर करण्याचे काम झाल्यानंतर गाडी परळी शहराकडे जाण्यासाठी निघाली होती. परळी शहर काही अंतरावर असताना गाडीचा विद्युत तराना स्पर्श झाल्याने स्फोटासारखा आवाज झाला. यात ४ कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील गोविंदा व संदीप यांचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरु आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top