Home / News / विधानसभेत तानाजी सावंतांच्या नांग्या ठेचणार! रोहित पवारांची टीका

विधानसभेत तानाजी सावंतांच्या नांग्या ठेचणार! रोहित पवारांची टीका

सोलापूर- विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या नांग्या ठेचणार अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आज...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सोलापूर- विधानसभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या नांग्या ठेचणार अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आज अरण येथे संत सावता माळी भक्त निवासाचे लोकार्पण आमदार रोहित पवार व‌ खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली.
आमदार रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्यासारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्य मंत्री सावंत यांनी मंत्री पदाच्या काळात पैसे गोळा केले आहेत. त्यांनी त्यांच्या आरोग्य विभागात तर हजारो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तानाजी सावंत खोटा माणूस आहे. अशा माणसाला विधानसभा निवडणुकीत जाग दाखवली जाईल. त्यांच्या मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.

Web Title:
संबंधित बातम्या