Home / News / विनेश फोगाट-बजरंग पुनियाने राहुल गांधींची भेट घेतली

विनेश फोगाट-बजरंग पुनियाने राहुल गांधींची भेट घेतली

नवी दिल्ली- विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेदरम्यान कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेदरम्यान कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जास्त वजनामुळे विनेश फोगटचे पदक हुकले. ती भारतात परतल्यावर हरियाणातील काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुडा यांनी तिची भेट घेतली होती. तेव्हापासून तिच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस एक-दोन दिवसांत हरियाणातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या