Home / News / विनेश फोगाट यांच्या प्रचार रॅलीला सासरपासून सुरवात

विनेश फोगाट यांच्या प्रचार रॅलीला सासरपासून सुरवात

चंडीगड – कुस्तीपटू विनेश फोगट या नुकत्याच काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत, त्यांनी आज जुलाना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात तिच्या पतीच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

चंडीगड – कुस्तीपटू विनेश फोगट या नुकत्याच काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत, त्यांनी आज जुलाना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात तिच्या पतीच्या मूळ गावी बक्त खेडा येथून केली. यावेळी राठी समाजासह सात खाप पंचायतींकडून विनेश फोगट यांचे स्वागत केले. यादरम्यान त्यांनी रोड शो काढला आणि लोकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. हरियाणातील जाट भूमीतील बांगर भागातील जुलाना ही जागा इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी सारख्या पक्षांचा नेहमीच बालेकिल्ला आहे, जे गेल्या १५ वर्षांपासून या जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे ही जागा जिंकणेही विनेशसाठी आव्हानात्मक असणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या