विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या मॉडेलची जामिनावर सुटका

डेहाराडून

मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलने विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांसोबत गैरवर्तन केले आणि विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर या मॉडेलला डेहाराडून विमानतळावर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही वेळाने तिची जामीनावर सुटका झाली. मेघा शर्मा (३२) असे या मॉडेलचे नाव आहे. ती मुंबईमध्ये राहते.

मेघा तिच्या एका मित्रासोबत मसुरीला गेली होती. ती शुक्रवारी दुपारी ३.१० वाजता विमानाने मुंबईला परतण्यासाठी निघाली होती. यावेळी डेहराडूनच्या जॉली ग्रँट विमानतळावर तिच्या हातातल्या बॅगचा फोटो स्क्रिनिंग सिस्टमवर स्टष्टपणे दिसत नव्हता. त्यामुळे सीआयएसएफ अधिकारी सुनीता देवी यांनी मेघाची बॅग पुन्हा एकदा तपासायला देण्याची मेघाला विनंती केली. यावेळी मेघाने त्यांच्यासोबत वाद घातला आणि अपशब्दांचा वापर करत त्या ठिकाणी गोंधळ घातला. सुनीता यांनी मेघाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असता, तिने विमानतळ बॉम्बस्फोट करून उडवण्याची धमकी दिली. त्यानंतर सीआयएसएफ उपनिरीक्षक सुनीता देवी यांनी तक्रार केली. या तक्रीनंतर पोलिसांनी मेघाविरोधात कलम ३५३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करत मेघाला अटक केली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मेघाची जामीनावर सुटका करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top