विश्रांती कालावधीबाबत नवे धोरण एअर इंडियाच्या पायलट संघटना चिंतीत

मुंबई – एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संघटना असलेल्या इंडियन पायलट्स गिल्ड म्हणजेच आयपीजी आणि इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन म्हणजेच आयसीपीएनी एअर इंडियाच्या नवीन उड्डाण सेवा आणि विश्रांती कालावधीच्या धोरणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

एअर इंडिया कंपनी डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन)च्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.इंडियन पायलट्स गिल्ड आणि इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन या दोन संघटनांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला लिहिलेल्या संयुक्त पत्रात हा आरोप केला आहे.या पत्रात म्हटले आहे की,एअर इंडियाने फ्लाइट सर्व्हिस ड्युरेशन लिमिटबाबत एक अतिरिक्त धोरण तयार केले आहे,जे डीजीसीचे अधिकार आणि उद्देशांना बाधा पोहोचव आहे, असे दिसते.पायलट संघटनांनी डीजीसीएकडे याचे पुनरावलोकन आणि मूल्यांकन करण्याची मागणीदेखील केली आहे. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची विनंतीही करण्यात आली आहे. वैमानिक आणि क्रू सदस्यांचा उड्डाण सेवा कालावधी विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएद्वारे ठरवला जातो. नियामकाने गेल्या महिन्यात वैमानिकांसाठी अधिक विश्रांतीचे तास प्रस्तावित केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top