विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त?

मुंबई :

गृहमंत्रालयाच्या आदेशापुर्वीच महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील पुण्याच्या नव्या आयुक्तपदी विरजमान होण्याची शक्यता आहे. “बॉस लवकरच पुण्यात?” असा मजकूर लिहीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांने स्टेटस ठेवले होते. त्यामुळे आता विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त होणार आहेत का अशा चर्चा सुरू झाली आहे.

या स्टेटसची पुण्यासह राज्यभरातील आयपीएस आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे. विश्वास नांगरे पाटील सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. दुसऱ्या बाजूला, नुकतेच आईपीएस अधिकारी रितेश कुमार यांनी पुण्यातील १०० टोळ्यांवर “मोक्का” अंतर्गत कारवाई करून नवीन विक्रम केला आहे. त्यांचा कार्यकाळ देखील पूर्ण झालेला नाही. मात्र, पुढील २,३ महिन्यात रितेश कुमार यांची पदोन्नती होत आहे. पुण्याची जबाबदारी कोणावर दिली जाणार यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच आता नांगरे पाटील यांच्या बद्दल शिवसेना पदाधिकाऱ्याने स्टेटस ठेऊन एका नवीन चर्चेला तोंड फोडले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top