Home / News / वुहानमधून जैविक पदार्थांची तस्करी चीनी महिला संशोधकाला अटक

वुहानमधून जैविक पदार्थांची तस्करी चीनी महिला संशोधकाला अटक

वॉशिंग्टन – परदेशातून जैविक पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी चीनच्या वुहानमधील संशोधक असलेल्या पीएच.डी. विद्यार्थीनीलाअमेरिकेत अटक करण्‍यात आली. चेंग्झुआन हॅन असे तिचे...

By: Team Navakal

वॉशिंग्टन – परदेशातून जैविक पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी चीनच्या वुहानमधील संशोधक असलेल्या पीएच.डी. विद्यार्थीनीलाअमेरिकेत अटक करण्‍यात आली. चेंग्झुआन हॅन असे तिचे नाव आहे. डेट्रॉइट मेट्रोपॉलिटन विमानतळावर एफबीआय या अमेरिकेच्या तपास संस्थेने ही कारवाई केली. याच प्रकरणी मागील आठवड्यात आणखी दोघांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी एक्सवर पोस्‍ट करत म्हटले आहे की, “डेट्रॉइटमध्ये आणखी एका चिनी नागरिकाला जैविक साहित्याची तस्करी आणि खोटी माहिती दिल्‍याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चेंग्झुआन हॅन ही वुहानमधील हुआझोंग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात पीएच. डी. करत आहे. मिशिगन विद्यापीठात ती एक वर्ष संशोधन करणार होती. तिच्‍यावर काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना जैविक पदार्थ पाठवल्याचा आरोप आहे. तिने पाठवलेली जैविक पदार्थ हा विशिष्ट प्रकारच्या हानिकारक बुरशीशी संबंधित आहे. यासाठी सरकारी परवानगी आवश्यक असते.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या