वृंदावनमध्ये पहिली कन्या सैनिक शाळा

मथुरा – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सोमवारी वृंदावन येथील पहिल्या कन्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले. आजूबाजूच्या परिसरातील सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या इथल्या मुलींसाठी ही शाळा नक्कीच दीपस्तंभ म्हणून काम करेल, असे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संविद गुरुकुलम सैनिक स्कूलमध्ये ८७० विद्यार्थिनींना शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने राज्य सरकार,स्वयंसेवी संस्था आणि खासगी शाळांच्या भागीदारीत देशभरात १०० नवीन सैनिक शाळा उघडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या शाळा
स्थापन करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या शाळेचे उद्घाटन करण्यात आले.वृंदावन येथील वात्सल्य ग्राममध्ये ‘संविद गुरुकुलम, सैनिक स्कूल’चे उद्घाटन यावेळी करण्यात आले.यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, सशस्त्र दलात भरती होऊन मातृभूमीची सेवा करण्याची इच्छा असलेल्या मुलींसाठी संवेद गुरुकुल कन्या सैनिक शाळा ही एक प्रकाशकिरण आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकारने सैनिक शाळेत मुलींच्या प्रवेशाला मान्यता दिली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top