वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर भाड्यात वाढ

कटारा – माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेताना आता भाविकांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. आता एकेरी प्रवासासाठी २१०० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी १६ ऑक्टोबरपासून वाढलेले हे भाडे लागू होणार आहेत. सध्या हे भाडे प्रति व्यक्ति १८३९ रुपये आहे.

याआधी २०२० मध्ये कोरोनाचे कारण देत हेलिकॉप्टर भाडे ११७० रुपयांवरून १८३० रुपये करण्यात आले होते. आता तीन वर्षांत भाडे जवळपास दुप्पट झाले आहे. सध्या ग्लोबल वेक्ट्रा आणि हिमालयन हेली या दोन हेलिकॉप्टर कंपन्या ही सेवा देत आहेत. दररोज सुमारे दोन ते अडीच हजार भाविक सेवेचा या लाभ घेतात. ज्या भाविकांनी नवरात्रीचे ऑनलाइन आगाऊ बुकिंग केले आहे. त्यांनाही नवीन वाढलेले भाडे भरावे लागणार आहे. ही हेलिकॉप्टर सेवा दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू असते. दर तीन वर्षांनी हेलिकॉप्टर सेवेसाठी निविदा काढली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top