Home / News / व्हिएतनाम भारताकडूनब्रह्मोस खरेदी करणार

व्हिएतनाम भारताकडूनब्रह्मोस खरेदी करणार

व्हिएतनाम – भारताकडूनब्रह्मोस खरेदी करणारहनोईफिलीपिन्सपाठोपाठ आता व्हिएतनाम देखील भारताचे ब्रह्मोस सुपसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे.व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

व्हिएतनाम – भारताकडूनब्रह्मोस खरेदी करणारहनोईफिलीपिन्सपाठोपाठ आता व्हिएतनाम देखील भारताचे ब्रह्मोस सुपसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे.व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा आशियाई देश बनणार आहे. या करारावर लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.चीनशी सुरू असलेल्या दक्षिण चीन समुद्रातील सागरी सीमेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनामने हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनला रोखण्यासाठी व्हिएतनाम आपले लष्कर मजबूत करण्याच्या तयारीत आहे.२०२४ मध्ये भारत आणि व्हिएतनाममधील लष्करी संबंध अधिक दृढ झाले आहेत. याआधी फिलीपीन्सने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केले आहेत. हा करार ३७५ दशलक्ष डॉलरचा झाला होता. यामध्ये तीन ब्रह्मोस क्षेपणास्त्र बॅटरीचा करार करण्यात आला होता.भारताने ही क्षेपणास्त्रे फिलीपिन्सला पुरवण्यास सुरुवात केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या