व्हिडीओ तयार करण्यासाठी गुगलचे नवे एआय मॉडेल

वॉशिंग्टन

गुगलने काही दिवसांपूर्वीच जेमिनी हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे मॉडेल लाँच केले होते. आता गुगलने आणखी एक नवे मॉडेल लाँच केले आहे. लुमिएरे असे या नव्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेलचे नाव आहे. यामुळे व्हिडिओ एडिटिंगची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. या मॉडेलच्या मदतीने व्हिडिओमध्ये हवे ते बदल करता येतील.

गुगलच्या या नव्या मॉडेलच्या मदतीने मजकूर लिहून व्हिडीओ तयार करू शकता. टेक्स्ट टू व्हिडीओ आणि इमेज टू व्हिडीओ असे या कंपनीच्या नव्या मॉडेलचे वैशिष्ट आहे. गुगलचे हे नवे मॉडेल कशा प्रकारे कार्य करते याबाबत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार टेक्स्ट वरून केवळ व्हिडीओच नाही तर मोशन व्हिडीओदेखील तयार करू शकता. एक्स वर या मॉडेलच्या कार्याबाबत एक लेख प्रसिध्द करण्यात आला आहे. या लेखाद्वारे हे मॉडेल कसे कार्य करते याची सोप्या पध्दतीने माहिती दिली आहे. या मॉडेलच्या मदतीने टेक्स्ट लिहून व्हिडीओ तयार करू शकता, कोणत्याही पोस्टवरून व्हिडीओ बनवू शकता, स्टाइलाइज्ड जनरेशन, म्हणजेच तुम्ही तुमच्या शैलीत व्हिडीओ तयार करू शकता, फोटो अॅनिमेट करू शकता. हे मॉडेस तुम्हाला व्हिडीओ एडिटींगमध्ये मदत करणार आहे. यामध्ये तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कोणत्याही वस्तूचा रंग, कपडे इत्यादी बदलू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top