व्हॉयेजर-१ चा संपर्क तुटला नासाची चिंता वाढली

वॉशिंग्टन

अंतराळयात्रेवर रवाना झालेल्या नासाच्या व्हॉयेजर-१ यानातून संदेश येणे बंद झाले आहे. त्यामुळे नासाची चिंता वाढली आहे. व्हॉयेजर-१ हे यान पृथ्वीपासून तब्बल २४ अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे यानाला संदेश पाठवण्यासाठी २२.५ तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. यानातील एका संगणकातील दुरुस्तीमुळे ४६ वर्षे जुन्या असलेल्या या अंतराळ मोहिमेतील यानाचा संपर्क तुटला आहे. तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नासाचे अभियंते प्रयत्नशील आहेत.

व्हॉयेजर-१ हे अंतराळयान अंतराळात आपल्या सौर यंत्रणेच्या बाहेर असलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी रवाना पाठवण्यात आले आहे. आजवर जिथे कोणीही पोहोचले नाही, इतक्या दूरवर पोहोचण्याचे या यानाचे उदिष्ट आहे. याच मोहिमेचा भाग असलेले ‘व्हॉयेजर-२’ हे यान आतापर्यंत २० अब्ज किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. या यानांत ३ संगणक आहेत. यामध्ये एक फ्लाईट डेटा सिस्टमही कार्यरत आहे. या फ्लाईट डेटा सिस्टमच्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते आणि इंजिनिअरिंग डेटाला जोडली जाते. याच माध्यमातून आतापर्यंत ‘व्हॉयेजर-१’ची सद्यस्थितीची माहिती गोळा केली जात होती. मात्र, फ्लाईट डेटा सिस्टम आता ऑटो रिपीटमध्ये अडकली आहे. त्यामुळे व्हॉयेजर-१ चा संपर्क होत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top