शंभर चिनी वेबसाईट ब्लॉक केंद्र सरकारची कारवाई

नवी दिल्ली :

आर्थिक घोटाळ्यांवर कारवाई म्हणून भारत सरकारने १०० फसव्या चिनी वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. तपास यंत्रणांना गोंधळात टाकण्यासाठी या वेबसाइट्स एकाहून अधिक बँक खात्यांशी लिंक केल्याचे आढळून आले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत त्यांच्या अधिकाराचा वापर करून या वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. आर्थिक फसवणुकीच्या विरोधात निर्णायक पाऊल म्हणून केंद्र सरकारने सुमारे १०० चिनी ऑपरेटेड गुंतवणूक घोटाळ्याच्या वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. याद्वारे भारतीय नागरिकांची फसवणूक केली जात होती. देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अशा घोटाळ्यांबाबत विविध राज्यांनी चिंता व्यक्त केली होती. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यावर कारवाई केली आहे. हैदराबाद पोलिसांनी यासंदर्भातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक उघडकीस आणला होता. जिथे चिनी चालवत असलेल्या फसव्या योजनेने लोकांना अंदाजे ७१२ कोटींचा गंडा घातला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top