शरद पवारांचे १० वर्षांनी मुंबई ऐवजी बारामतीत मतदान

बारामती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीमधील माळेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. शरद पवारांनी १० वर्षांनी मुंबई ऐवजी बारामतीतून मतदान केले. बारामतीतून सुप्रिया सुळे लोकसभा लढवत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी यंदा त्यांच्या सुकन्या सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, पती सदानंद सुळे, रेवती सुळे यांच्यासह सर्व कुटुंबियांनी मतदान केले. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदानसाठी शरद पवार स्वतः रांगेत थांबले होते. दरम्यान, शरद पवार २०१९ पर्यंत मुंबईत मतदान करत होते. मात्र आता शरद पवार त्यांनी आपले नाव मुंबईतून कमी करून घेत बारामती विधानसभा क्षेत्रात माळेगाव येथील गोविंदबागेच्या पत्त्यावर नोंदवले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top