शरद पवार यांच्या पक्षाचा झेंडा समोर आला

मुंबई – शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव मिळाले, तर तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले. या पक्षचिन्हा रायगडावर अनावरण करण्यात आले. त्यानंतर पक्षाचा झेंडा कसा असेल याची उत्सुकता होती. ती आता संपुष्टात आली. आमदार जितेंद्र आव्हान यांनी पक्षाचा झेंडा हातात घेऊन सोशल मीडिय़ावर एक फोटो शेअर केला आहे. राष्ट्रध्वजासारखा तिरंगा आणि त्यावर वर्तुळामध्ये तुतारी वाजविणारा माणूस असा हा झेंडा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top