शरद मोहोळ हत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक

पुणे – मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. आदित्य गोळे , नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तिघांनी आरोपीला पिस्तुलखरेदीसाठी आर्थिक मदत केल्याचे सांगितले जात आहे.

शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी हजर होता. यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची व्यवस्था ही नितीन खैरे याने केली होती. तर आदित्य गोळे याने बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. मोहोळचा खून करण्यासाठी रचलेल्या कटात ह्या दोघांचाही समावेश होता. अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी फोनद्वारे इतर आरोपींच्या संपर्कात होता. दरम्यान, ५ जानेवारी रोजी सुतरदारा येथील राहत्या घराजवळ शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोहोळचे साथीदार मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचा सहभाग आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top