शरीराच्या रक्त चाचणीतून समजणार अवयवांचे वय!

*स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संशोधन

लंडन- वाढत्या वयाबरोबरच आता केवळ एका रक्त चाचणीद्वारे आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयवही किती वृद्ध होत चालले आहेत हे समजणार आहे.स्टॅनफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाचे निष्कर्ष ‘ नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकेतून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेकांना रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.तसेच कमी वयातच काही लोक हृदयविकाराच्या आजाराला बळी पडत आहेत.त्यामूळे वयाच्या चाळिशी किंवा पन्नाशीनंतर डॉक्टर मंडळी नियमितपणे वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला देताना दिसतात.अनेकांना ते शक्य होत नाही.यामुळे अचानक कठिण प्रसंगाला तोंड द्यावे लागते.मात्र आता हे टाळण्यासाठी केवळ एका रक्त चाचणीतून आपल्या अवयवांचे वृद्धत्व आपणाला समजणार आहे.आपला कोणता अवयव वृद्धत्वाकडे वेगाने झुकत चालला आहे. त्यावरुन पुढील धोका टाळता येणार आहे. माणसाने आरोग्य चांगले जपले नाही,तर त्याचा वृद्ध होण्याचा वेग हा सरासरीपेक्षा जास्त असतो. त्यालाच आपण खर्‍या वयापेक्षा तो म्हातारा दिसतोय असे म्हणतो.

स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार,वयाच्या पन्नाशीनंतर कोणत्याही व्यक्तीचा किमान एक अवयव सरासरीपेक्षा अधिक वेगाने वृद्ध होत असल्याचे जाणवते.या व्यक्तिंना पुढील १५ वर्षांत काही आजार आणि मृत्यूचा मोठा धोका असतो.खरे तर माणसाच्या हृदय,मेंदू आणि फुफ्फुसांसह शरीराच्या ११ प्रमुख अवयवांचे निरीक्षण करता येते.त्यातूनच भविष्यातील धोके टाळता येतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top