शाहूवाडीत बिबट्याचा हल्ला शाळकरी मुलीचा मृत्यू

कोल्हापूर

काल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारुण परिसरातील तळीचावाडा येथे बिबट्याने एका शाळकरी मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. सारिका बबन गावडे असे या मृत मुलीचे नाव आहे. सारिका तिच्या घराशेजारीच शेळी चारण्यासाठी गेली होती. दरम्यान घरापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिकावर हल्ला केला. यावेळी सारिकासोबत असणाऱ्या तिच्या काकीने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वनविभाग मलकापूर येथे नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top