शिकागोजवळ तरूणाचा गोळीबार! ८ जणांचा मृत्यू

शिकागो

अमेरिकेतील शिकागोजवळ असणाऱ्या जोलिएटआणि इलिनॉय या उपनगरांत एका २३ वर्षीय तरूणाने ३ ठिकाणी गोळीबार केला. या गोळीबारात ८ जणांचा मृत्यू झाला. रोमियो नॅन्स असे गोळीबार करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. रोमियो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गोळीबारात मृत्यू झालेले सर्व एकाच कुटूंबातील असल्याचे सांगितले जात आहे.

जोलिएटचे पोलीस प्रमुख बिल इव्हान्स यांनी याबाबत सांगितले की, दोन घरांमध्ये एकूण ८ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेतील संशयित २३ वर्षीय नॅन्स या घरांजवळ राहत होता. गोळीबाराच्या हेतूबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. रविवारी आणि सोमवारी २ वेगवेगळ्या ठिकाणी पीडितांचे मृतदेह आढळले. या धोकादायक आरोपीबाबत सोशल मीडियावर इशारा देण्यात आला होता. हल्लेखोर सशस्त्र आणि धोकादायक आहे. ठार झालेल्या लोकांपैकी एकाचा मृतदेह विल काउंटीमधील घरात सापडला. सोमवारी जोलिएटमधील दोन घरांमध्ये ७ लोक मृतावस्थेत आढळले. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. संशयिताचा फोटो आणि आरोपीच्या लाल गाडीचे फोटो शेअर केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top