शिवशाही बसला लागलेल्या आगीची समितीमार्फत चौकशी

नाशिक :

नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या शिवशाही बसला रविवारी चितेगाव फाटा येथे लागलेल्या आगीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने समितीमार्फत अपघाताची चाैकशी सुरू केली आहे. समिती अहवालानंतर आगाचे कारण स्पष्ट होईल.

चितेगाव फाट्याजवळ शिवशाहीला बसला आग लागल्याची घटना घडली. इंजिनाजवळ धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने वेळीच प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातावेळी बसमध्ये २९ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांनी नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे प्रवास सुरू केला होता. मात्र, अपघातानंतर शिवशाहीच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले. एसटी महामंडळाने या अपघाताची दखल घेत चाैकशी समिती नेमली आहे. समितीकडून आगीत खाक झालेल्या बसची तपासणी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. समितीच्या अहवालानंतरच आगीच्या घटनेचे स्पष्ट होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top