शेअर बाजारात तेजी कायम! निफ्टी नव्या उच्चांकावर

मुंबई- शेअर बाजारात आज सलग सहाव्या सत्रांत तेजी कायम राहिली. सेन्सेक्स ३४९ अंकांनी वाढून ७३,०५७ वर बंद झाला. निफ्टीने २२,२१५ वर झेप घेत नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी ७४ अंकांच्या वाढीसह २२,१९६ वर स्थिरावला. सेन्सेक्स आज ७२,७२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,१०० वर गेला. निफ्टी आज २२,०९९ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २२,२१२ पर्यंत वाढत नवे शिखर गाठले. शेअर बाजारात सुरुवातीला काही प्रमाणात घसरण झाली होती. पण नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने रिकव्हरी करत उच्चांकी पातळीवर व्यवहार केला. बँक, मीडिया, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी १-३ टक्क्यांनी वाढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top