शेअर बाजारात नवा विक्रम निफ्टी प्रथमच २२,१८० पार

मुंबई

शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रांत तेजी कायम राहिली. निफ्टीने आज २२,१८०च्या पातळीला स्पर्श करत प्रथमच सर्वकालीन उच्चांक गाठला. सेन्सेक्स आज ७२,६२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,८८१ पर्यंत वाढला. शेवटच्या सत्रांत सेन्सेक्स २८१ अंकांनी वाढून ७२,७०८ वर बंद झाला. निफ्टी आज २२,१०३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २२,१८६ पर्यंत वाढला. शेवटच्या सत्रांत निफ्टी ८१ अंकांच्या वाढीसह २२,१२२ वर स्थिरावला.

सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, सन फार्मा, टायटन, मारुती, आयटीसी हे शेअर्स तेजीत होते. विप्रो, एलटी, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स काही प्रमाणात घसरले. निफ्टीवर ग्रासीम, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, सिप्ला, आयसीआयसीआय बँक हे २ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. कोल इंडिया, विप्रो, एलटी, एसबीआय लाईफ हे शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १७ शेअर्स वाढीसह आणि १३ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २८ शेअर्स वाढीसह आणि २२ शेअर्स घसरणीसह बंद झाले. ऑटो, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांमध्ये तेजी राहिली. क्षेत्रीय पातळीवर कॅपिटल गुड्स, मेटल आणि रियल्टी वगळता इतर सर्व निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार केला. ऑटो, बँक, हेल्थकेअर, पॉवर ०.५-१ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढला. बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज ३९१.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top