मुंबई
जागतिक शेअर बाजारात आज गुंतवणुदारांनी तेजी अनुभवली. बँका, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये खरेदीचा माहौल होता. सेन्सेक्स आज ३५८ अंकांनी वाढून ७०,८६५ वर बंद झाला. निफ्टी १०४ अंकांनी वाढून २१,२५५ वर स्थिरावला. सेन्सेक्स सुरुवातीला ६९,९२० पर्यंत खाली घसरला होता.