शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स ११०० अकांनी कोसळला

मुंबई

शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी घसरण झाली. आजच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० वर बंद झाला. सेन्सेक्स आज ७३,४९९ वर खुला झाला होता. निफ्टी ३४५ अंकांनी घसरून २१,९५७ वर स्थिरावला. बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या आठवड्यातील शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, एम अँड एम, एसबीआय, एचसीएल टेक, इन्फोसिस हे शेअर्स तेजीत होते. एलटी, एशियन पेंट्स, आयटीसी, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले. सेन्सेक्सवर एल अँड टी हा शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी घसरून ३,२७७ रुपयांवर आला. रिलायन्सचा शेअर्स १.५ टक्क्यांनी घसरून २,८०० रुपयांवर आला. निफ्टीवर हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, टाटा मोटर्स, एसबीआय, एचसीएल टेक हे शेअर्स तेजीत होते. एलटी, एशियन पेंट्स, कोल इंडिया, बीपीसीएल, ओएनजीसी हे शेअर्स ३ ते ६ टक्क्यांपर्यंत घसरले. एचडीएफसी बँकचा शेअर्स १.६ टक्के घसरणीसह १,४५६ रुपयांवर आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top