शेअर बाजारात विक्रमी घसरण

मुंबई
शेअर बाजारात आज विक्रमी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 1,628 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 460 अंकांची घसरण झाली. गेल्या 16 महिन्यामधील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मात्र 4.5 लाख कोटींचे नुकसान झाले.
बँकिंग आणि वित्तीय समभागांच्या विक्रमी घसरणीने शेअर बाजाराचे कंबरडे मोडले. सेन्सेक्सच्या 1600 अंकांच्या घसरणीत एकट्या एचडीएफसी बँकेच्या 950 अंकांची म्हणजे साडे आठ टक्क्यंची घसरण झाली. बँकेच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर ही मोठी घसरण आहे. आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top