शेअर बाजाराने उभारली नव्या विक्रमाची गुढी

मुंबई

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर बाजाराने आज नवा विक्रम रचला. सुरुवातीच्या व्यवहारात आज सेन्सेक्सने झेप घेतली. आज सेन्सेक्सन पहिल्यांदाच ७५,००० चा टप्पा पार केला. तसेच निफ्टीने पहिल्यांदाच २२,७५० चा उच्चांक गाठला. दुपारच्या व्यवहारात बाजारातील तेजी ओसरली. सेन्सेक्स ५८ अंकांच्या घसरणीसह ७४,६८३ वर बंद झाला. निफ्टी २३ अंकांच्या घसरणीसह २२,६४२ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एम अँड एम, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत राहिले. टायटन, रिलायन्स, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी केवळ १२ शेअर्स वाढीसह बंद झाले आणि १८ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीवर अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस हे शेअर्स तेजीत होते. टायटन, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, रिलायन्स, एशियन पेंट्स हे शेअर्स घरसले. क्षेत्रीय पातळीवर मीडिया, ऑटो, कॅपिटल गॉड्स, एफएमसीजी ०.५-१ टक्क्यांनी घसरले. मेटल आणि रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top