शेअर बाजार आज सुरू ट्रेडिंगच्या वेळेत बदल

मुंबई 
 मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्या शनिवारी शेअर बाजार सुरू राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना शनिवारी गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. मात्र ट्रेडिंगच्या वेळेत काही बदल करण्यात आला आहे. शनिवारी  २ विशेष लाईव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केली जाणार आहेत. या विशेष लाईव्ह ट्रेडिंग सत्रादरम्यान गुंतवणूकदार शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो. त्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या सत्राची वेळही निश्चित करण्यात आली. पहिले सत्र सकाळी 9.15 वाजता सुरु असून ते सकाळी 10 वाजता संपणार आहे. दुसरे सत्र सकाळी 11.30 वाजता सुरु होऊन दुपारी 12.30 वाजता बंद होईल. सेबी कोणत्याही अडथळ्याशिवाय शेअर मार्केटमधील व्यवहार सुरु ठेवण्यासाठी एक चाचणी घेणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top