शेअर बाजार उद्या खुला राहणार

मुंबई- शेअर बाजार उद्या शनिवार असून देखील खुला राहणार आहे. स्टॉक एक्स्चेंज बीएसई आणि एनएसईने शनिवारी शेअर बाजारासाठी असलेली सुट्टी रद्द केली आहे. अनपेक्षित डिझास्टर हाताळण्याच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी शनिवारी विशेष ट्रेंडिग सत्र आयोजित केले आहे. शनिवारचे विशेष सत्र दोन सत्रांत विभागले जाणार आहे.इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेडिंग सेटलमेट आणि बिलिंग सामान्य पण कमी कालावधीसाठी होणार आहे. एनसीई आणि बीएसईवर प्री-ओपन सत्र सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे आणि सकाळी 9.95 ते 10 वाजेदरम्यान सामान्य ट्रेंडिग होईल. डिझास्टर रिकव्हरी साईटचे प्री-ओपनिंग सत्र सकाळी 11.15 वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता सामान्य ट्रेडिंग होईल आणि दुपारी 12.30 वाजता बंद होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top