शेकोटीमुळे झोपडीला आग 2 मुलांचा मृत्यू ! दोन जखमी

फिरोजाबाद
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या खडित गावात शेकोटीमुळे एका झोपडीला लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगी गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
जसराणा पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या खडित गावाबाहेर बंजारा वसाहत आहे. या वसाहतीतील झोपडीत राहणारा सलीम हा दीड वर्षाचा मुलगा अनिश, अडीच वर्षांची मुलगी रेश्मा आणि पाच वर्षांची मुलगी सामना यांच्यासोबत झोपला होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवण्यात आली होती. रात्री हे सर्व जण झोपले होते. या दरम्यान शेकोटीच्या ठिगण्यामुळे रात्री दहा वाजता झोपडीला आग लागली. काही वेळातच या आगीने उग्र रुपधारण केल्याने झोपडीतून या चौघांना बाहेर काढण्याची ग्रामस्थांना संघीही मिळाली नाही. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलीस आणि आग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी अनिश आणि मुलगी रेश्मा यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर मुलगी सामना आणि तिचे वडील सलीम यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top