शेवटची मुंबई मेट्रो रात्री ११ वाजता

मुंबई- मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान शेवटची मेट्रो १०.३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.उद्या शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोचा हा बदल लागू होईल.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याचे सुचविले होते.त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top