श्रीदेवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव ५ डिसेंबरला

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग मधील देवसू येथील श्रीदेवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव ५ डिसेंबर रोजी होणार आहे. देवसू दानोली व केसरी या एकत्रित देवस्थानाचा हा जत्रोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देवसू येथील कूळ घरातून देवीचे चांदीचे मुखमंडल सवाद्य मंदिरात आणण्यात येणार आहे. भरजरी वस्त्रे व दागदागिन्यांसह मूर्तीला सजवण्यात येणार आहे.

यानंतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून गावचे तीनही मानकरी एकत्र येऊन देवीया साकडे घालून तिची ओटी भरणार आहेत. यावेळी इतर भाविक आपले नवसही फेडणार आहेत. त्याच रात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवसू ग्रामस्थ व मानकऱ्यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top