श्री जोतिबा देवाची आज यात्रा विहे गावची सासनकाठी दाखल

पाटण- सालाबादप्रमाणे होणारी दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा उद्या मंगळवार २३ एप्रिल रोजी कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर भरणार आहे. त्यासाठी पाटण तालुक्यातील विहे गावातील मानाची सासनकाठी आज डोंगरावर दाखल झाली. उद्या मंगळवारी सायंकाळी मुख्य छबिना निघणार असून त्यामध्ये दोन नंबरच्या
सासनकाठीचा मान विहे गावच्या मानाच्या सासनकाठीला मिळणार आहे.

शनिवारी सायंकाळी निघालेली ही मानाची सासनकाठी तीन दिवसांचा पायी प्रवास करून आज जोतिबा डोंगरावर दाखल झाली.आज पूजन आणि आरतीनंतर यमाई भेटीचा छबिना निघाला. त्यावेळी पुजारी यांच्याकडे गूळ पाणी कार्यक्रम पार पडला. उद्या मंगळवारी यात्रेचा मुख्य छबिना निघणार आहे.ही मुख्य यात्रा झाल्यानंतर धार्मिक व विधिवत कार्यक्रम आटोपून ही सासनकाठी परतीच्या प्रवासाला निघेल. त्यानंतर २६ आणि २७ एप्रिल रोजी विहे गावच्या जोतिबा यात्रेदिवशी गावात या सासनकाठीचे जल्लोषात स्वागत होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top