श्रेयस तळपदेला डिस्चार्ज पत्नीने मानले आभार

मुंबई
हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रातला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला ६ दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्याला १४ डिसेंबरला हदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

श्रेयस घरी परतल्यानंतर पत्नी दीप्तीने हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, मी श्रेयससोबत नेहमी भांडायचे की, विश्वास तरी कोणावर ठेवायचा. आज मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. त्याचं उत्तर देव असं आहे. हे सगळं घडलं तेव्हा देव माझ्या सोबत होता. आता यापुढं त्यांच्या असण्यावर मी कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. आज मी त्या सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी त्या संध्याकाळी माझी मदत केली. मी एकाला मदतीसाठी विचारलं अन् दहा हात पुढे आले. श्रेयस कारमध्ये होता, हे त्यांना माहितीही नव्हतं, त्या लोकांना माहिती नव्हतं की, ते कुणाला मदत करतायत ,तरी ते लोक माझ्या मदतीसाठी धावून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top