श्वान दंश उपचारासाठी पालघरच्या रुग्णाला ठाण्याची पाठवले

पालघर
पालघर तालुक्यातील माहीम या गावी पिसाळलेल्या श्वानाने दोन व्यक्तींवर हल्ला केला. ही घटना रविवारी घडली असताना उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दुसऱ्या दिवशी सोमवारी बोलविण्यात आले. रुग्णाच्या पायावर झालेली दंशामुळेची जखम प्रत्यक्ष न पाहता त्यांना त्यावरील उपचार लस उपलब्ध नसल्याचे सांगत सेलवास , ठाणे अथवा मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. या रुग्णाला ठाणे सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले.

माहीम शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांना पायाच्या पोटरीवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. पायावर असलेल्या पॅन्टमुळे या हल्ल्याची तीव्रता कमी जाणवली . तरी देखील त्यांच्या पायाच्या पोटरीवर श्वानाचे पाच दातांचे दंश उमटले. माहीम येथील खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
रविवार २६ नोव्हेंबर रोजी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात गेले असता वैद्यकीय अधिकारी नसल्याचे सांगून सोमवारी येण्याचा सल्ला दिला. सोमवारी ते पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात गेले असता लस उपलब्ध नसल्याचे सांगून सेलवास, गुजरात किंवा मुंबई, ठाणे येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. अखेर या व्यक्तीने ठाणे येथे जाऊन रेबीज ईम्युनोग्लोबुलीन घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top