संगमेश्वरमधील ३७ वाड्यांसह १४ गावांची पाण्यासाठी वणवण

संगमेश्वर- रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर या विस्तीर्ण ग्रामीण भाग असलेल्या तालुक्याला सध्या पाणीटंचाईची मोठी झळ बसू लागली आहे. या तालुक्यातील ३७ वाड्यांसह १४ गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. केवळ एका वाडीला सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरित गावे आणि वाड्या टँकरच्या प्रतिक्षेत आहेत.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी पडल्याने आणि सध्याच्या वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीपातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. विहिरींनी तळ गाठला असून, नदीनालेही कोरडेठाक पडले आहेत. सध्या केवळ पाचांबे गावातील नेरदवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू जात आहे. तालुक्यात यावर्षी २० एप्रिलला टँकर सुरू करण्यात आला. ओझरखोल आहे. मात्र (निढळवाडा), मासरग (धनगरवाडा), भडकंबा (बेर्डेवाडी, मोरेवाडी, पाकतेवाडी, पेढवाडी, मुस्लिमवाडी), शिबवणे (जुवळेवाडी व लटकेवाडी), विश्ववली (राववाडी, खालचीवाडी, बौद्धवाडी, माळवाडी), पेढांबे (खालचीवाडी), ओझरेखुर्द-तळवडे (उगवत, मावळत, मधलीवाडी, नेटकेवाडी, निर्मलवाडी, खांडेकरवाडी, निवाखालचीवाडी) यासह ३७ वाड्या आणि १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी अजून प्रलंबित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top