संजय सिंह यांच्या कोठडीत वाढ

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दिल्‍ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटक करण्‍यात आलेले संजय सिंह यांना पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आज ईडीने न्यायालयात सांगितले की, खासदार संजय सिंह यांनी लाच मागितल्याचे पुरावे आहेत. दारूच्या परवान्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. त्यानंतर ईडी ने न्यायालयात खासदार संजय सिंग यांच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली, मात्र न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी मंजूर केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top