Home / News / संततधार पावसामुळे तामिळनाडूत पूर शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांना सुट्टी

संततधार पावसामुळे तामिळनाडूत पूर शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांना सुट्टी

चेन्नई – काम मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर गुढघाभऱ पाणी जमा झाले....

By: E-Paper Navakal

चेन्नई – काम मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर गुढघाभऱ पाणी जमा झाले. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले. सरकारने आज पूरस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालजे बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून आयटी क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास परवानगी द्या,अशा सूचना दिल्या.चेन्नईमध्ये काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहराला तलावाचे स्वरूप आले. सर्वत्र पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. पुरात वाहून जाण्याच्या भीतीने बहुतांश वाहनचालकांनी उड्डाण पुलांवर आपली वाहने उभी केली.चेन्नईसह तिरुवेल्लूर आणि आसपासची उपनगरांतही पावसाने दाणादाण उडाली.बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तामिळनाडू,पुदुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा सीमावर्ती भाग, रायलासीमा, दक्षिण कर्नाटक आणि केरळ या परिसरात पावसाचा जोर पुढील दोन दिवस असाच राहील,असे हवामान विभागाने सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या