Home / News / संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे १८ जूनला प्रस्थान

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे १८ जूनला प्रस्थान

छत्रपती संभाजीनगर– आषाढी वारीनिमित्त पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान यंदा १८ जूनला पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. यावर्षी नाथ महाराजांच्या...

By: Team Navakal

छत्रपती संभाजीनगर– आषाढी वारीनिमित्त पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान यंदा १८ जूनला पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. यावर्षी नाथ महाराजांच्या पालखीला चांदीपासून बनविलेल्या रथाचा साज चढणार आहे, पुण्यात त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रथासाठी सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. या ११० चौरस घनफूट लाकडावर तब्बल १२० किलो शुद्ध चांदी बसवली जाणार आहे. सध्या लोकवर्गणीतून ८० किलो चांदी जमा झाली असून, उर्वरित ४० किलो चांदीसाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी केले आहे. या चांदीच्या रथासाठी २१ लाख रुपयांची मजुरी ठरवण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध रथ निर्माते रमेशभाई मिस्री आणि राजूभाई मिस्री हे काम करत आहेत. याच तज्ज्ञांनी यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या रथांचे कामही केले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या